How to use SSC Online?


हा प्लॅटफॉर्म कसा वापरावा

या प्लॅटफॉर्मवर एसएससी बोर्डाचा इयत्ता १० वी चा अभ्यासक्रम आहे. आपल्या बीड जिल्ह्यातील शिक्षकांनीच तो बनवला आहे.

विद्यार्थ्यांसाठी:

1. तुम्हाला ह्या वेबसाईटवर फक्त विषय आणि धड्याचा क्रमांक निवडायचा आहे आणि तुम्हाला तो संपूर्ण धडा एकाच पानावर खाली स्क्रोल करून पाहता येईल.
2. तुमच्या सोयीसाठी प्रत्येक धड्याला काही कृतिसंचांमध्ये विभागले आहे. एका कृतिसंचात तुमच्यासाठी काही सूचना, व्हिडीओ, इमेजेस, ऑनलाईन परीक्षा, घरी करायला गृहपाठ इ. गोष्टी असतील.
3. तुम्ही रोज कोणत्या विषयाचे आणि किती कृतीसंच पूर्ण करायचे हे तुमचे शाळेतील शिक्षक तुम्हाला सांगतील.
4. तुम्हाला कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी किंवा कृती करण्याआधी दिलेल्या सूचना लक्ष देऊन वाचा.
5. यामध्ये तुम्हाला काही अभ्यास ऑनलाईन टेस्ट च्या स्वरुपात असेल, ज्याचे मार्क तुम्हाला लगेच समजतील आणि कुठे चुकले हे देखील समजेल. टेस्ट देऊन झाल्यावर शो रिझल्ट वर क्लिक करा. काही गृहपाठ हा वहीवर करून तुमच्या शिक्षकांना व्हॉट्सप वर पाठवायचा आहे.
6. प्रत्येक धड्याच्या शेवटी तुम्हाला Exit Slip (तुमचा अभिप्राय/ फीडबॅक) भरून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या शाळेचा UDISE code टाकायचा आहे, तुमच्या शिक्षकांकडून तो मागून घ्या.
7. एखादे पेज व्यवस्थित लोड झाले नाही, एखादी प्रतिमा नीट दिसत नसेल तर पेज परत लोड करा.
8. तुम्ही एखादी इमेज/ आकृती/ नकाशा दोन बोटांनी झूम करून पाहू शकता.
9. नेहमी व्हिडीओ फुल स्क्रीन मोड मध्ये पहा.

शिक्षकांसाठी:

1. तुमच्या सूचनांनुसार मुले या प्लॅटफॉर्मचा वापर करून अभ्यास करणार आहेत. यासाठी तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुलांचा व्हॉट्सप ग्रुप तयार करायचा आहे. त्याबद्दलची अधिक माहिती खालील pdf मध्ये वाचा.
2. तुमच्या शाळेतील सर्व शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या मदतीने सर्व विषयांचे वेळपत्रक बनवून घ्या. त्याबाबतची अधिक माहिती खालील pdf मध्ये वाचा.
3. तुम्हाला तुमच्या वर्गातील मुले कसा अभ्यास करत आहेत, याबद्दलची माहिती दर आठवड्याला गुगल फॉर्म द्वारे भरायची आहे. त्याबाबतची अधिक माहिती खालील pdf मध्ये वाचा.
4. तुम्हाला मुलांच्या पालकांशी देखील संपर्कात राहायचे आहे. त्यांना काय सांगावे याबद्दल अधिक माहिती खालील pdf मध्ये वाचा.
5. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या विषयाचा धडा पूर्ण पाहून घ्या. वर्गातील काही विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार थोडा बदल करू शकता किंवा वेगळा गृहपाठ द्यायचा असल्यास तुम्ही तसे करू शकता.
6. तुमच्या वर्गातील सर्व मुले याद्वारे अभ्यास करतील याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर ती लगेच सोडवा, त्यासाठी फक्त व्हॉट्सप मेसेज करणे पुरेसे नाही, स्वतःहून पालकांना फोन करा. तुमच्या पातळीवर अडचण सुटत नसेल तर त्वरित तुमच्या मुख्याध्यापकांना किंवा आम्हाला कळवा.
7. या अभ्यासक्रमात काही बदल सुचवायचा असेल, काही चूक दुरुस्त करायची असेल, काही नवीन सुचवायचे असेल तर आम्हाला contact.vschool@gmail.com या ईमेल वर लिहा.

For Teacher Guideline Click Here